रविवार, १९ सप्टेंबर, २०१०

हरवलेला दरवळ





का कोण जाणे, आता कविता अचानक अडखळते...
शब्द तर जुळत जातात सरळ, सम काही सापडत नाही !!


शब्दांतले अर्थ चाचपडत नुसता शाईत खेळत राहतो...
ओळी जमतात गजर्‍यासारख्या गंध तेवढा सापडत नाही !!



कागदावर शब्द सरसर येतात पक्ष्यांच्या थव्यासारखे...
काही चपखल, काही अवखळ, यमक तेवढं गवसंत नाही !!





- रोहित ऊर्फ दुष्यंत.

२ टिप्पण्या:

अभिप्राय नोंदवा :