मनातलं गूज कोणाला तरी सांगावसं वाटतं,
भरभरून काही बोलावसं वाटतं !
पण म्हणावं तसं मन मोकळं होत नाही !
खूप उसासत राहतं,
आणि मग एक कविता जन्माला येते !!
कधी कुणाला न ऐकवलेली कैफियत
तर कधी दडवून ठेवलेली प्रेमाची लाजलेली फुलं !
रिमझिमणार्या मनाचं काय असं गुपित आहे
रितं रितं असतं तेव्हा मुसळधार बोलेल,
गहिवरून येईल तेव्हा आपल्याशीच अबोला धरेल !
- दुष्यंत उर्फ रोहित
भरभरून काही बोलावसं वाटतं !
पण म्हणावं तसं मन मोकळं होत नाही !
खूप उसासत राहतं,
आणि मग एक कविता जन्माला येते !!
कधी कुणाला न ऐकवलेली कैफियत
तर कधी दडवून ठेवलेली प्रेमाची लाजलेली फुलं !
रिमझिमणार्या मनाचं काय असं गुपित आहे
रितं रितं असतं तेव्हा मुसळधार बोलेल,
गहिवरून येईल तेव्हा आपल्याशीच अबोला धरेल !
- दुष्यंत उर्फ रोहित