मंगळवार, २१ सप्टेंबर, २०१०

अनद्यतन भूतकाळ !!

काल-परवाच्या आठवणी नजरेस पडतात..
आणि मग मन जातं भूतकाळात !!
वर्तमानकाळाची कठोर बंधनं मोडून
चार आनंदाचे क्षण उपभोगायला... !!

तेव्हाची हास्य आजही ताजी वाटू लागतात
परकी झालेली पाखरं पुन्हा माझी वाटू लागतात !
आठवतात सारे रुसवे-फुगवे,फजिती अन् विनोद
पण गालावरची खळी तेवढी फुलायची राहते !!

वाटतं असं आतून, पुन्हा वेलीस बहर यावा..
तेव्हाचा गंध पुन्हा मनोमन साठवून घ्यावा !
सुखाची अभिलाशा घेऊन येथवर आलोय खरं
पण पुन्हा टाळी द्यायला, तो हात हातात नाही.. !


- रोहित ऊर्फ दुष्यंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्राय नोंदवा :