बरे! निघालो कुणास काही कळण्याआधी !
अजून कोणा मी गेल्याचा पत्ता नाही !!
कसे निघाले पाऊल अलगद मलाच माझे
कळण्याआधी, बरेच अंतर आलो होतो !!
पुन्हा नव्याने असेच कोण्या वळणावरती
कुणी भेटता, निघण्याचे क्षण मोजून घेतो
बरे ! निघावे कुणास काही कळण्याआधी
पुढल्या वळणावर कोणाची सोबत होऊ !
- रोहित ऊर्फ दुष्यंत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्राय नोंदवा :