मनाशीच संवाद साधायचे ! मनाचे उसासे गिरवायचे !! अर्थांत शब्दांस फिरवायचे ! निखारे मनाचे शमवायचे !! क्षणाने क्षणाला भुलवायचे ! निमिषात आकन्ठ भिजवायचे !! अश्रूंसवे हास्य सजवायचे ! प्रश्नास विश्रांत निजवायचे !! नव्या स्वप्न-जगतास प्रसावायचे ! सुखी शांत आत्म्यास वसवायचे !! - दुष्यंत उर्फ रोहित
अभिप्राय नोंदवा :
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्राय नोंदवा :