शनिवार, ३१ डिसेंबर, २०११

पुरे रे मना, वाट बघणे कुणाची,
पुन्हा एक कविताच होणार आहे !
पुरे, आस आता गंधलेल्या क्षणांची,
नव्याने उसासाच निघणार आहे !!
 
कुण्या आठवांचे, कधी सांजवेळी,
कुठे साठवावे, वाहणारे थेंब चार ?
तसे थेंब आणि सांज सरते सकाळी,
उरे आत कविता, राहते बंद दार !!

जगाला जगूदे जगाच्या रितीने,
नको प्रश्न आता, कशाचा-कुणाचा,
जरासा रिकामा तरीही नव्याने,
कुणाचा नको, हो जरासा स्वत:चा !!



- रोहित ऊर्फ दुष्यंत

२ टिप्पण्या:

  1. ही कविता आता मी "कवी दुष्यंत म्हणतात" अशा स्टाइलने वापरणार आहे !

    उत्तर द्याहटवा

अभिप्राय नोंदवा :