(नेहमीच्या काव्याकृतीबंधातून बाहेर येऊन, हा एक रचनेचा वेगळा प्रयत्न ! सर्वांनाच रुचेल, असं नाही !)
सुचेना ! लिहावे असे काही शिलकीत नाही !
स्मरेना ! कुणा सांगण्याजोगते गुज काही !
जमेना ! जपावे असे काय स्फुरलेच नाही !
कळेना ! उत्तरावे असे प्रश्न पडलेच नाही !
सजेना ! नटावे असे रूप खुललेच नाही !
वठेना ! शिरीपेच होण्या रत्न जडलेच नाही !
असेना ! किती हौस रमण्यात फिटलीच नाही !
निजेना ! सडा चांदण्याचा पापणी मिटलीच नाही !
- रोहित ऊर्फ दुष्यंत
सुचेना ! लिहावे असे काही शिलकीत नाही !
स्मरेना ! कुणा सांगण्याजोगते गुज काही !
जमेना ! जपावे असे काय स्फुरलेच नाही !
कळेना ! उत्तरावे असे प्रश्न पडलेच नाही !
सजेना ! नटावे असे रूप खुललेच नाही !
वठेना ! शिरीपेच होण्या रत्न जडलेच नाही !
असेना ! किती हौस रमण्यात फिटलीच नाही !
निजेना ! सडा चांदण्याचा पापणी मिटलीच नाही !
- रोहित ऊर्फ दुष्यंत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्राय नोंदवा :