तेच-तेच वाटणे, अन् तीच-तीच जागा !
तोच-तोच भास, अन् त्याच-त्याच ओळी !
येती अशा ओठांवर, त्याच-त्याच वेळी !!
तीच-तीच अंतरे, अन् तेच-तेच छंद !
त्याच-त्याच युक्त्या, अन् तोच-तोच रंग !
सजे पुन्हा सांजवेळी, पश्चिमेचे अंग !!
तीच-तीच नाती, अन् तेच-तेच चेहरे !
त्याच-त्याच कविता, अन् तेच-तेच सारे !
तोच-तोच चंद्र-सूर्य, तेच-तेच तारे !
- रोहित ऊर्फ दुष्यंत
ajun pudhe kar na!!!!!
उत्तर द्याहटवा