शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

राहून गेलेली कविता..

कविता लिहावी, अशी कोणी भेटलीच नाही अजुन !
कोण जाणे... एक कविता व्हायचीच नसेल !!
जुळवा-जुळव शब्दांची होतेच की आपसूक !
पण ओळ अशी गुलाबी.. व्हायचीच नसेल !!

कधी ओल्या सांजेला, प्रश्न पडलाच नाही !
कोण जाणे... पावसातलं उत्तर नशीबीच नसेल !!
तशी मनाची घालमेल, रोजचीच आहे !
पण रात्रीला हूरहुर लागायचीच नसेल... !!

-रोहित उर्फ दुष्यंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्राय नोंदवा :