सोमवार, २१ मार्च, २०११

का कोण जाणे ...

का कोण जाणे ...
पण एक फूल एवढं आवडू लागतं....
आणि त्याच्या पाकळी वर
पडलेलं दंव देखील,
भार वाटू लागतं !!


झाडावरून अलगद काढून
कोणी त्याला परडीत घेतात...
मनभर दरवळणारा गंध त्याचा,
आठवण म्हणून जपून ठेवतात !!


क्षण अन् क्षण ठेवीन जपून,
तुझ्या असण्याचा अर्थ,
मग कळेल...
तू नसताना... !!



तुझं हसु चोरून घेईन हळूच !
मग कळेल...
हसणं काय असतं...
एकटं असताना... !!


खूप ऐकायचय
तुझं मौन..
साठवायचीये प्रत्येक आठवण
डोळे भरून... !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्राय नोंदवा :