हार क्षणिक असते मित्रा...
हरण्यात कसलं भय ?
पुन्हा पुन्हा हरून जिंकण
हेच खरं होय !
रुसू नकोस कोणावरही,
दोष कुणा देऊ नकोस...
जगत राहा जगण्यासाठी
पाऊल मागं फिरवू नकोस !
भंग होईल ते स्वप्न,
बघूच नये असं नाही..
सत्य देखिल कधीतरी,
स्वप्ना सारखं जगून बघ !
जगाच्या आकाशात तुझी भरारी,
नसेलही ऊंच कदाचित..
तुझ्यासाठी तुझं आकाश
शोध.. स्वच्छन्द उडण्यासाठी !!
babid la dakhav hi kavita !!!! far mahatvachi aahe tyachyasathi !!!
उत्तर द्याहटवाmast ahe!!!!
उत्तर द्याहटवा