सोमवार, २८ फेब्रुवारी, २०११

सांग...


सांज कशाने होते गहिरी
रात्र अशी का छळते वैरी ?
रम्य दिसाची स्वप्नें जागत
पहाट येते, सरत्या प्रहरी !!

लखलखणारे, दूर चांदणे
आसुसलेली अंत:करणे
माझ्यासाठी चमचमणारे
सांग कशाने, येतील जवळी ?

सांग कशाने, साठवलेली
स्वप्ने सारी अवतरतील का ?
तीच ठेच पण, पुन्हा नव्याने
अश्रू कोणी, आवरतील का ?

असे कधी गं आलो होतो
जाण्यासाठी दूर, नभांशी
सांग गवसणी, घालतील का
ते उडलेले अल्लड पक्षी ?

वाटेवरचे अडसर सारे,
पुन्हा एकदा झिडकारून, या
उरलेल्या जगण्याची गंमत
सांग तयांविण कशी यायची ??





-रोहित उर्फ दुष्यंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्राय नोंदवा :