बुधवार, २३ फेब्रुवारी, २०११

"तिची" कविता

कुणास ठाऊक मनात ऐसे काय दाटले !
मला आताशा अशी अवेळी सुचते कविता !!

तोच बिछाना, तेच पांघरूण, तेच उसासे ! 
स्वप्नांचीही नक्षी होऊन रुणझुणते कविता !!

तिचे लाजणे पुन्हा आठवून हरवून जातो !
भानावरती येता,  कविता हरवून जाते !!

नसेल केली आयुष्याची माझ्या देखील,
इतकी खटपट यमकासाठी भावुन जाते !!


-रोहित ऊर्फ दुष्यंत

1 टिप्पणी:

अभिप्राय नोंदवा :