मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०१०

बरसेन लवकरंच... !!


कसं सांगू एका क्षणात
तिला जन्माचं गूज !
पाऊस देखिल सांजेशी
मुसळधार बोलतो !!

कसं बोलू एका वाक्यात
काय काय दाटलंय !
नेमक्या वेळी डोळ्यांमध्ये
धुकं थोडं साठलंय !!


थोडा मेघांचा गडगडाट
मिळेल काय उसना ?
मिळेल का इंद्रधनुष्याची एखादी लकेर
बरसताना पाठराखणीला !!


रिमझिमणार्‍या सरीसारखं
मन थोडं ओलं आहे !
आता मेघ आवरून घेतोय
बरसेन लवकरंच... !!

-रोहित उर्फ दुष्यंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्राय नोंदवा :