गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०१०

"शहारा"

पाऊसही तिच्या प्रेमात नखशिखांत भिजलाय..
मावळतीच्या वाटेवरचं इंद्रधनुष्य होऊन !
न जाणो, तू कधी भिजशील पावसात..
शहारून तो मात्र कोसळतोच आहे.. !!

रात्री देखील त्याला असं कोसळावं वाटलं,
तुझ्या सारखं, त्याला देखील हसावसं वाटलं !
मी सुद्धा आतूर आहे त्या पावसात भिजायला
ज्या पावसात तुझी सर मन चिंब भिजवेल !!

पानांवरती थेंब होऊन तुझ्याकडेच बघतोय
तू बाहेर आल्यावरती कोसळेन म्हणतोय !!
किती रे कोसळशील अजुन तिच्या साठी
ती आलीच नाही तर रडायला अश्रू तरी शिल्लक ठेव... !!


- रोहित ऊर्फ दुष्यंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्राय नोंदवा :