हरण्याची सवयच जडलीय जणू,
जिंकून बघावसंच वाटत नाही ... !
उमेद घेऊन नवी कधी,
जगावसंच वाटत नाही ... !!
हरवून गेलंय हास्य,
निराशेच्या गर्तेत...
रडू आवरून,
खळखळून हसावसंच वाटत नाही ...!
हरण्याची सवयच जडलीय जणू,
जिंकून बघावसंच वाटत नाही ... !!
कोमेजून जाता हे आयुष्य
चुटकी सरशी..
पालवी होऊन कधी,
पुन्हा बहरावसंच वाटत नाही .. !
हरण्याची सवयच जडलीय जणू,
जिंकून बघावसंच वाटत नाही ... !!
खोल खोल रुतणारी भावना
आता बोथट झाली असावी...
कारण स्वप्नांनाही,
पूर्वीसारखं यावसंच वाटात नाही ... !!
हरण्याची सवयच जडलीय जणू,
जिंकून बघावसंच वाटत नाही ... !!
शब्दासारखे शब्द देखील
आटत आहेत आता...
कागदावरती,
मनसोक्त लिहावसंच वाटत नाही ... !
हरण्याची सवयच जडलीय जणू,
जिंकून बघावसंच वाटत नाही ... !!
जिवलगही परके झाले
क्षणांत सारे...
हाकेलाही 'साद' आता
द्यावीशीच वाटत नाही ... !
हरण्याची सवयच जडलीय जणू,
जिंकून बघावसंच वाटत नाही ... !!
उमेद घेऊन नवी कधी,
जगावसंच वाटत नाही ... !!
-रोहित उर्फ दुष्यंत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्राय नोंदवा :