सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१०

गोळाबेरीज

आलो एकटेच... जाणार एकटेच
ह्व्यात कशाला  जन्माच्या गाठी ??

एकटयानेच चालायची अरुंद पायवाट
सावलीची सोबत तरी कशासाठी ??

शब्द शब्द जोडून केलेली कविता
सुरावटीत बसेलच अस नाही...
मनाच्या जाणीवांचे ओढलेले ताशेरे
"चित्र" म्हणवले जातीलच अस नाही...

पण म्हणून तो मुक्तछन्द
निराधार होत नाही,
कि ते चित्र
अर्थशून्य होत नाही !

आयुष्याचं गणित मांडून
आकडेमोड करीत राहायची,
उत्तर माहीत असून देखील
गोळाबेरीज करत राहायची !!


-रोहित उर्फ दुष्यंत

२ टिप्पण्या:

अभिप्राय नोंदवा :