(श्रीकृष्णाची, व आपणा सर्वाँची जाहीर माफी मागून !)
पामर उवाच-
फुंकीले शंख युद्धास रणवाद्येची फुंकीली
काय झाले अर्जुनास अचानक कळेचि ना !
अडून बैसला पठ्ठा, म्हणे शस्त्र न चालवी !
कृष्णाची जाहली ऐशी, पंचाईत खरोखर !!
नुरला तरणोपाय, असे श्रीकृष्ण बोलिला !
मग त्याने अर्जुनास, घेतले फैलावर !
चालले हे कुरूक्षेत्री, धृतराष्ट्रा न राहवे !
छळ होई संजयाचा, सारखे "सांग संजया !"
कपाळ संजयाचे हे आठ्यान्नी भरले असे !
धृतराष्ट्रा ज़रा धीर, धरू ही शकसी न का ?
असे कृष्ण "खरा वक्ता", सर्वाँ तिष्ठत ठेवले !
मानले तुज मी कृष्णा, जाहलो नतमस्तक !!
पामरा मज शंका ही मनी सतत येतसे !
कृष्णाख्यान तिथे चाले, केळी का खात कौरव ?
असो जे जाहले गेले, गन्गार्पण म्हणू चला !
तात्पर्य एवढ़े घ्यावे, गीताभ्यास करू चला !
पुस्तके बहू वाचावी, गीता का अपवाद ही ?
धर्मग्रंथ म्हणू त्याते, त्याचे अज्ञान का असे !
पामरास मज गीतेचे थोड़े ग्रहण जाहले !
सोळा सहस्त्र बाया जो, करी तो "कृष्ण" होतसे !!
इति श्री रोहितनाम पामरेन विरचितं पामरगीताख्यानस्तोत्रं सम्पूर्णम !
-रोहित ऊर्फ दुष्यंत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्राय नोंदवा :