जगत आलो आजवर , छोट्या - वेड्या आशा घेऊन |
एक तरी आशा त्यातील, ईर्ष्या बनून राहू दे,
एक तरी झुळूक माझी, वारा होऊन वाहू दे ... ||
भिजले असेल मन माझे, आसवांनी दोन-चार थेंब |
एक तरी अश्रू माझा, मोती होऊन चमकू दे,
मुक्त होऊन एकदा तरी पावसासारखी बरसू दे ||
ऐकत आलो संगीत, सप्त-सुरांनी नटलेले |
एक तरी स्वर त्यातील, खोल - खोल जाऊ दे,
एकदा तरी पाऊल माझे, तालावरती थरकू दे ||
फिरलो असेन जगभर, ह्याच्या-त्याच्या सांगण्यावरून |
एकदा तरी 'माझ्या तालात' सारे जग डोलू दे,
वार्याशिवाय झोका माझा ऊंच - ऊंच झुलू दे....||
गुंफत गेलो आयुष्याला, सुख - दु:खाच्या दोराने |
जोडत गेलो नाती सारी, आम्ही तोला - मोलाने,
एका तरी नात्या-साठी जीवन अवघे फुलवू दे... ||
- रोहित उर्फ दुष्यंत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्राय नोंदवा :