बाणासारखे सुटतात ना,
खोलवर रुततात ना,
त्यांना शब्द म्हणायचं !!
तुम्ही - आम्ही बोलतो,
अर्थामध्ये तोलतो !
भाल्यांसारखे मारतो,
फुलांसारखे झेलतो !!
त्यांना शब्द म्हणायचं !!
कधी कधी, पानांवर दवासारखे येतात !
मुक्यानेच सारं काही, कानात सांगून जातात !!
ज्यांच्या गारव्याला, थेंब निजतात ना !
त्यांना शब्द म्हणायचं !!
मोल नाही ज्याला , जे अमृत म्हणावे,
खेद नाही ज्यांना, त्यांचे अश्रू का गळावे !
आज पानोपानी , ज्यांना इथे विकतात ना !
त्यांना शब्द म्हणायचं !!
- रोहित उर्फ दुष्यंत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्राय नोंदवा :