शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०१०

"पश्चिमसंध्या"

आता पाऊस नाही येणार, वारा गाणे नाही गाणार !
मन मात्र पुढच्या पावसापर्यंत हिरवंगार राहील !!

अशी कोवळी हुरहूर लाऊन गेलाय,
क्षितीजालाही कानोसा लागू नये असा दूर !

पण "त्याचा" मृद्गंध भिनतोय, मातीचा श्वास होऊन !
इंद्रधनुष्याची ती पश्चिमसंध्या आजही गाते, "त्याच्या" बरसण्याचा भास होऊन !!

-रोहित ऊर्फ दुष्यंत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्राय नोंदवा :