सारे सरले किलबिल जगणे
कुणास आता उसंत नाही !
लाटा होत्या, सारे जिवलग
तिला किनारा पसंत नाही !
किती मनांच्या तारा जुळल्या
प्रवास इथला अनंत नाही !
नवीन वाटा नवीन सोबत
आठवणींना दिगंत नाही !
गुरफटलेली तुझी आठवण
तो गुलाब आता जिवंत नाही !
अशी स्तब्धता लेऊन सारे
कुठेच आता वसंत नाही !
80% kalali :D
उत्तर द्याहटवा