शनिवार, १४ ऑगस्ट, २०१०

सहज सुचलं ... लिहून टाकलं !!

उधाणलेलं मन आहे
जगण्याची इच्छा घेऊन ऊंच उडणारं!
 
उदंड इच्छा आहेत
आशेच्या कोनाड्यात उत्कटतेने तेवणार्‍या!
 
असंख्य हृदयं
उसळतं चैतन्य रोमरोमात भिनवत आहेत!
 
चर्चांचे डोंगर खूप झाले
अन् फावल्या वेळच्या गप्पाही
आता लढणारे हात हवेत!
 
स्वत:च्या कोषातून जरा बाहेर पडूया
टीका करण्यापेक्षा जबाबदारी स्वीकारूया!
एकदा तरी आपण सारे मनापासून म्हणूया
भारत माझा देश आहे!

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

-रोहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्राय नोंदवा :