Thursday, June 2, 2011

चिंब

गाव भर पसरलेल्या पाऊलखुणांच्या वळण-वाटा,
पाऊस असा पुसत चाललाय..
मुसळधार आठवणी अंगावर झेलत,
माझ्या 'मी'पणाची छत्री अशी उडताना,
मी मात्र चिंब सुखावलोय !!

No comments:

Post a Comment

अभिप्राय नोंदवा :