कधी ऊंच शिखरं सर नाही केली
म्हणून डोंगर चढलोच नाही असं नाही.. !
मोठया प्रवाहात नाही पडलो
म्हणून पोहलोच नाही असं नाही.. !
अवाजवी अपेक्षांचं ओझं नसेल उचललं..
पण रिकाम्याच हाताने कधी परतलो नाही !
माझं हसू हास्यास्पदही असेल कदाचित..
पण खळखळून हसलोच नाही असं नाही.. !
-रोहित उर्फ दुष्यंत
No comments:
Post a Comment
अभिप्राय नोंदवा :