आयुष्यात, प्रत्येक क्षणी प्रेम होऊ शकतं !
ऊन-पावसावर, रात्रीच्या चांदणसरींवर,
गाण्यातली सुरेल शब्दमाळ हळूच हृदयाला जाऊन भिडते तेव्हा,
कवितेची एखादी ओळ मनाची पाऊलवाट गहिरी करून जाते तेव्हा त्या कवितेवर !
अलगद आपल्या कुशीत शिरणार्या मांजराच्या गोंडस पिल्लावर !
खूप वर्षांनंतर पुन्हा त्याच जुन्या कट्ट्यावर मित्रांची मैफल जमते तेव्हा, त्या कट्ट्यावर !
जिच्यावर टांग मारून लहानपण गेलं त्या जुन्या सायकल वर !
एकटेच समुद्रकिनारी उभे राहून त्याची अथांगता न्याहाळताना,
आपसूक आपल्याच खुजेपणाची जाणीव होऊन, आपले आपल्यावरच !
आयुष्यात, खरंच प्रत्येक क्षणी प्रेम होऊ शकतं !!
- रोहित ऊर्फ दुष्यंत
No comments:
Post a Comment
अभिप्राय नोंदवा :