Thursday, April 28, 2011

छन्द !

(काही नाती, कधी पुन्हा न जुळण्यासाठी विरून जातात ! अशाच एका नात्या साठी .... )

तुझी आठवण घेऊन येते, कोण अनामिक गंध !
नकोच असला, जुन्या दिसांना उलगडण्याचा छन्द !!

अशी साठवण किती क्षणांची, मनात आहे बंद !
नकोच अत्तर, किती सुगंधी असो कुपीतच बंद !!

कधी सांजवेळी, अशा गंधलेल्या क्षणांचा मनाला जरा भास होतो !
अशा जाणीवांचे सुगंधी उसासे, जरा हुंदके अन्, मोकळा श्वास होतो !!

2 comments:

  1. अतिशय अप्रतिम काव्य रचना!
    Hats off!!

    ReplyDelete
    Replies
    1. Eka Kavine asa mhanana hi mothi bhagyachi gosht ahe :D

      Delete

अभिप्राय नोंदवा :