Sunday, October 3, 2010

मन-मुक्ता



रंगात न्हाऊनी अन्
आकाश नेसलेली
अस्तास भुलवू लागली..

विरहात रंगलेल्या
डोळ्यातल्या दवाने
ओळी पुसाया लागली..

ती मुग्ध रंगलेली
माझी न राहिलेली
कविता स्फुराया लागली..




-रोहित ऊर्फ दुष्यंत.




No comments:

Post a Comment

अभिप्राय नोंदवा :