Saturday, August 21, 2010

पावसाळा

पावसात आलो होतो गारव्याचे थेंब झेलत
उद्याच्या रम्य स्वप्नांत मैत्रीचा गंध पेरत !!

खूप चेहरे होते, सारेच अनोळखी !
त्यांत आजचे जिवलग शोधताना वर्षं कशी सरली ते कळलंच नाही.. !!

आता पुन्हा नवीन पाऊस, नवे थेंब, नवा गारवा..
नवे चेहरे, नवे मैत्र, नवे गीत, नवा मारवा.. !!

खूप वाटतं तोच पाऊस कोसळत रहावा.. मनाला चिंब भिजवत रहावा ..
पण त्या ओलाव्याची ऊब कळण्यासाठी, तो उन्हाळा यावा लागतो.... !!



-रोहित ऊर्फ दुष्यंत

No comments:

Post a Comment

अभिप्राय नोंदवा :